Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  John 17 >> 

1ह्या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “ हे बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.

2जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.

3सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.

4जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.

5तर आता, हे माझ्या बापा, हे जग होण्याआधी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.

6“ जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.

7आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत.

8कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर आेळखले, आणि तू मला पाठवले.असा त्यांनी विश्वास ठेवला.

9त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.

10जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे.

11आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.

12जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोंपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नांवात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.

13पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि, माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो.

14मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.

15तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.

16जसा मी जगाचा नाही, तसे तेहि जगाचे नाहींत.

17तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.

18जसे तू मला जगांत पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.

19आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.

20“मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करतो

21की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.

22तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे;

23म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरहि प्रीती केली.

24हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.

25हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे.

26मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  John 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran