Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 61 >> 

1प्रभु परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.

2परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.

3सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.

4“ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पुर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.”

5परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत कामे करतील.

6तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती खाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.

7“तुझ्या लाज्जे ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”

8कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.

9त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांना आशिर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”

10मी परमेश्वर ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो. कारण जसा नवरा फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वता:ला भुषित करते, तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.

11कारण पृथ्वी जशी आपले अंकूरलेले रोप उगवते, आणि जशी बाग त्याच्यामधील लागवड उगवते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व राष्ट्रांसमोर चांगुलपणा व प्रशंसा अंकुरीत करीन.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 61 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran