Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 57 >> 

1धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि करारचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.

2तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.

3पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या.

4तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता? कोणा विरूद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? तुम्ही बंडखोरांची मुले, खोट्यांची संतान नाही काय?

5तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्या मध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.

6नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियूक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत. तु तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. ह्या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?

7तु तुझे अंथरून उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तु यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.

8तु आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, तु मला निर्जन केले आहे, तु स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तु आपले अंथरूण पसरट केले. तु त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरून तुला प्रिय झाले, तु त्यांचे खासगी भाग पाहिलेस.

9तेल घेऊन तु राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधे पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अती दूर पाठविले, आणि तु अधोलोकात गेलीस.

10तु आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.” आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बल झाली नाहीस.

11तु कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तु फसवेपणाचे काम केलेस? तु माझी दखलही घेतली नाही किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे माझ्या बद्दल विचारही केला नाही. मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.

12मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेल, पण तुझे कृत्ये लक्षात घेतली असता, ते तुला मदत करणार नाही.

13जेव्हा तु रडशील, तेव्हा तुझ्या मुर्तींचा समुदाय तुला सोडवो. त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल, आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल.

14तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा, माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.

15कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चात्तापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.

16कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वका रागहि धरणार नाही. कारण माणसाचा आत्मा आणि मी त्याला दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील.

17कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्याला शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो. पण तरीहि तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चलत गेला.

18मी त्याचे मार्ग पाहिले आहेत, पण मी त्याला बरे करीन. मी त्याला मार्गदर्शन करीन आणि त्याला व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल.

19आणि मी फळ ओठांचे तयार करतो, जो दूर आहे त्याला, आणि जो जवळ आहे त्याला शांती, शांतीच असो, असे परमेश्वर म्हणतो. आणि मी त्याला निरोगी करीन.

20पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात.

21“पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 57 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran