Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 53 >> 

1“आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?

2कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला; त्याच्यात उल्लेखनीय रुप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्याला पाहीले, आम्हाला आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती.

3लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो माणूस होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत,असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्याला किरकोळ मानले.

4पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहीले; तरी आम्ही देवाने त्याला शिक्षा केलेली,देवाने त्याला हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला.

5पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली,त्याच्या जखमांनी आम्हाला आरोग्य मिळाले.

6पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून दूर गेलो होतो;आम्ही प्रत्येक आपापल्या मार्गात फिरलो होतो, आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले.

7त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते,तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.

8बळजबरी करून आणि निवाडा करून त्याला दोषी ठरवून, पण त्याला जिवंतांच्या भूमीतून काढून नेले;कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला.त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय?

9त्याची कबर गुन्हेगाराबरोबर करण्याचा त्यांचा बेत होता,त्याच्या मृत्यूनंतर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते.

10तरी परमेश्वराची इच्छा होती त्याला जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापासाठी अर्पण करता, तो त्याची संतती पाहील,तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परीपूर्ण होईल.

11तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर,तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील;तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.

12ह्यामुळेच मी त्याला त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल, कारण त्याने आपले जीवन मरणापर्यत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 53 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran