Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 35 >> 

1यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसांत यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले,

2“रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.”

3म्हणून मी हबसिन्याचा मुलगा यिर्मया याचा मुलगा याजना आणि त्याच्या भावांना व सर्व मुलांना आणि रेखाब्याच्या सर्व घराण्याला घेतले.

4मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात, देवाचा माणूस इग्दल्याचा मुलगा हानान याच्या खोलीत आणले. ह्या खोल्या शल्लुमाचा मुलगा मासेया द्वारपाल, याच्या बाजूच्या खोलीच्या वर असलेल्या नेत्यांची होती.

5नंतर मी रेखाब्यांसमोर द्राक्षरसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले आणि त्यांना म्हणालो, “थोडा द्राक्षारस प्या.”

6पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज, रेखाब यांचा मुलगा योनादाब, यांने आम्हाला आज्ञा दिली, ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्वकालपर्यंत कोणताही दाक्षारस पिऊ नये.’

7शिवाय कोणतेहि घरे बांधू नका, कोणतेहि बी पेरु नका, किंवा कोणतेही द्राक्षमळे लावू नका. हे तुमच्यासाठी नाहीत. तर तुम्ही आपल्या सर्व दिवसात तंबूत राहिले पाहिजे,याकरीता ज्या देशात तुम्ही परदेशी आहात त्यात दीर्घकाळ जगावे.’

8आमचा पूर्वज रेखाब याचा मुलगा योनादाब याची वाणी आम्ही पाळत आलो आहोत, त्यात आम्ही आमच्या बायका, आमची मुले, आणि आमच्या मुलींनी आपल्या सर्व दिवसात द्राक्षारस पिऊ नये अशी आज्ञा त्याने आम्हास दिली आहे.

9आणि आम्ही त्यात राहण्यासाठी कधीहि घरे बांधीत नाही आणि तेथे आमच्या स्वत:च्या मालकीची शेते वा द्राक्षमळे नाहीत.

10आम्ही तंबूत राहतो आणि ऐकतो व आमचा पूर्वज योनादाब यांने आम्हास सर्व आज्ञापिल्याप्रमाणे वागत आलो.

11पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरुशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरुशलेमेमध्ये राहत आहोत.”

12मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,

13सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदातील माणसांना व यरुशलेमेच्या रहीवाश्यांना सांग, तुम्ही माझी वचने ऐकूण आणि शासन स्विकारणार नाही का?” असे परमेश्वर म्हणतो.

14“रेखाबाचा मुलगा योनादाब याने आपल्या मुलांना कोणताही द्राक्षारस ‘पिऊ नका’ अशी आज्ञा दिली त्यांनी त्याचा शब्द आजपर्यंत पाळला. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आज्ञेचे पालन केले. पण मी स्वत: तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आलो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.

15इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हाला जो देश दिला आहे त्यात परत माघारी या. पण ह्या लोकांनी माझे ऐकले नाही.

16कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण ह्या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.

17म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा,जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरूद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरुशलेमेच्या राहणाऱ्यावर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”

18यिर्मया रेखाबाच्या कुटुंबीयांना म्हणाला, “सैन्याधीश परमेश्वर, इस्राएलचा देव, असे म्हणतो ‘तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्यांच्या आज्ञा ऐकल्या आणि त्या सर्व पाळल्या. जे त्याने करण्यास आज्ञापिले त्याप्रमाणे तुम्ही केले आहे.

19म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी कोणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 35 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran