Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 34 >> 

1परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरुशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. हे वचन म्हणाले,

2परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील.

3तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.

4सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.

5तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुजकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.

6म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरुशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली.

7त्यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमेविरुद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.

8सिद्कीया राजाने यरुशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले.

9तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्रीी दासाला, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.

10म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले.

11पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.

12मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणले,

13परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे तेव्हा मी म्हणालो,

14‘जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्याला तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमचे पूर्वज माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.

15आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या माणसाला स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यात तुम्ही माझ्यासमोर करार केला होता.

16पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक माणसाने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत.

17यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो,पाहा, मी तुम्हाविरूद्ध तरवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण मी पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हाला असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.

18मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले.

19जे यहूदा आणि यरुशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.

20मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जिव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील.

21म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जिव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देऊन.

22परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 34 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran