Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 3 >> 

1ते म्हणतात, एखाद्याने मनुष्याने त्याच्या बायकोला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वैश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे?” परमेश्वर असे म्हणतो.

2डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.

3म्हणून वसंत ऋतुतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.

4माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.

5‘तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?’ पाहा, “ तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करात आहेस.”

6नंतर योशीया राजाच्या दिवसांत परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “ इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहीलेस का ? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.

7मी म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहिण, यहूदाने पाहिले.

8आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे, तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला घटस्फोट दिला आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही आणि तिनीसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.

9तिने तिचा देश ‘भ्रष्ट’ केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्तींतयार केल्या.

10इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले.” असे परमेश्वर म्हणतो

11तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!

12तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहिन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, ‘मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी दयाळू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.

13तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरुद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू परराष्ट्रीयांसोबत आपले मार्ग वाटून घेतला, आणि माझा शब्द ऐकला नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

14“ अविश्वासू लोकहो, परत या.” परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पति17:10 18-08-2017 आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हाला सियोनला आणीन.

15माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हाला देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.

16आणि त्या दिवसां असे होईल की, तुम्ही देशांत बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल.” परमेश्वर असे म्हणतो, “त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, ‘परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणाणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बणवणार पण नाही.

17त्या वेळेला यरुशलेम बद्दल अशी घोषणा करतील, ‘ हे परमेश्वराचे सिंहासन आहे’ आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये एकत्र येतील. ह्या पुढे ते त्यांच्या दुरग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.

18त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

19“मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.

20पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.

21उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.

22विश्वासहिन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे ये कारण परमेश्वर आमचा देव आहेस!”

23टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे.

24तरिही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली मेंढ्या आणि गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली.

25आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरूणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran