Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 23 >> 

1“जे मेंढपाळ माझ्या कुरणातून मेंढरांचा नाश आणि त्यांची पांगापंग करीत आहेत, त्यांना हाय हाय! परमेश्वर असे म्हणतो,

2यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांना चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो.

3“मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात मी घलवला होता, त्यास एकत्र करणार,आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील.

4मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

5परमेश्वर असे म्हणतो, पाहा! दिवस येत आहेत. “मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन.” तो राजा म्हणून राज्य करणार, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.

6त्याच्या दिवसांत यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षितेत राहील. आणि ज्या नावाने त्याला हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण. (यहोवा सिदकेनू) असे असेल.

7यास्तव परमेश्वर असे म्हणतो. पाहा! असे दिवस येत आहेत ज्यात, ज्या परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले, तो जीवंत आहे’ असे म्हणणार नाहीत.”

8उलट ते असे म्हणतील, ‘परमेश्वर जीवंत आहे, ज्याने इस्राएलाच्या वंशांना उत्तरेकडील देशातून आणि सर्व देशांत ज्यात त्यांना घालवले होते, त्यातून बाहेर काढून वर चालूण आणले, असे म्हणतील.

9संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनांमुळे, माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. ज्यावर द्राक्षारस हावी झाले आहे,

10कारण व्यभिचाऱ्यांनी देश भरला आहे, यास्तव देश शोक करीत आहे. रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदेष्ट्यांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांचे शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.

11कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.

12यास्तव त्यांच्या मार्ग त्यांना अंधारत निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यात पडतील. कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन.” परमेश्वर असे म्हणतो.

13“शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बआल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले. आणि त्यांनी इस्राएलाच्या लोकांस चूकीच्या मार्गास नेले.

14आणि मी यरुशलेममधल्या संदेष्ट्यांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचार केला आणि दुष्टतेत चालले. ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणीही आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत. ते सर्व मला सदोमा सारखे आणि तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झाले आहेत .”

15यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणी विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.”

16सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हांला जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हाला भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात.

17माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, ‘ परमेश्वारने तुम्हांला शांती देऊ केली आहे, आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.’

18पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्याचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दांकडे लक्ष देऊन कोण ऐकेल?

19पाहा! परमेश्वराकडून वादळ येत आहे. त्याचा राग बाहेर जात आहे, आणि ती क्रोधाच्या वादळाची भोवळ आहे. ती दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.

20परमेश्वराने त्याच्या हृदयात जे करण्याचे ठरविले आहे, ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग परतणार नाही. शेवटल्या दिवसांत तुम्हांला हे समजेल.

21मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही, पण तेच संदेश द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने भविष्य करतात.

22कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते, तर ते माझ्या लोकांना माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून आणि कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.”

23परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?”

24परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो म्हणजे मी त्याला पाहू शकणार नाही? मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय?”

25“ संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे!’ मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे.

26संदेष्ट्ये जे खोटे भविष्यसांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार?

27हे संदेष्टे, ऐकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकांना माझ्या नामाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे ह्यांचे पूर्वज बआलामुळे माझे नाव विसरले.

28संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्याला सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो , त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.

29माझा संदेश अग्नीप्रमाणे नाही काय?” परमेश्वर असे म्हणतो. “ आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणेनाही काय?

30परमेश्वर असे म्हणतो “म्हणून पाहा! मी खोट्या संदेष्ट्यांविरुध्द आहे, जे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात आणि म्हणतात ते माझ्याकडून आले आहेत.

31परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी संदेष्ट्यांविरुद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात.

32परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी त्या संदेष्ट्यांविरुद्ध जे फसवे सप्ने सांगतात, म्हणजे ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व बढाई माझ्या लोकांना चुकीच्या मार्गांने नेतात. कारण लोकांना शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकांना खचित मदत करु शकत नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो.

33“ जेव्हा हे लोक व संदेष्टे किंवा याजक तुला विचारतील की ‘ परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तेव्हा तू त्यांना सांग, कोणती घोषणा? कारण मी तुम्हांला टाकले आहे, परमेश्वर असे म्हणतो.

34आणि संदेष्टे व याजक किंवा जो कोणी म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ मी त्याला व त्याच्या सर्व घराण्याला शिक्षा करीन.

35तुम्ही प्रत्येक आपल्या भावाला आणि आपल्या शेजाऱ्यास असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’

36पण तुम्ही कधीही ‘परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करुच नका, कारण प्रत्येकाला आपापलेच वचन ओझे असे होईल, कारण जीवंत देव, सेनाधीश परमेश्वर, आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत.

37“तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’

38आणि ‘परमेश्वराची घोषणा काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले.

39म्हणून मी तुम्हाला व जे नगर मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते मी आपल्या समक्षतेपासून दुर फेकून देणार.

40मी तुम्हावर कधीही विसरु शकणारी अप्रतिष्ठित आणि बदनामी ही आणीन.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 23 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran