Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 21 >> 

1यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कियाचा मुलगा पशहूर आणि मासे याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठविले. त्याने म्हटले,

2“आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्याला आमच्यापासून परतवून लावेल.”

3यिर्मया त्यांना म्हणाला, “सिद्कीया राजाला असे सांगा,

4परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो “पाहा! तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.“बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन.

5मी माझ्या सामर्थ्यवान हाताने, क्रोधाने व रोशाने व मोठ्या कोपाने तुमच्याशी युद्ध करीन.

6मी त्या शहरात राहाणाऱ्यांना व मनुष्यांना व प्राण्यांना मारीन. ते मोठ्या रोगराई ने मरतील.

7परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तरवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.’

8“आणि तू या लोकांना सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हांपुढे ठेवतो,

9जो या शहरात राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हांस वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्याला लूट असा होईल.

10पमेश्वर असे म्हणतो, कारण मी आपले मुख या शहराच्याविरद्ध चांगल्या साठी नाही तर त्याच्या वाईटासाठी केले आहे. “मी बाबेलच्या राजाला ते देऊन टाकीन. तो ते आगीत भस्मसात करील.’

11यहूदाच्या घराण्याविषयी परमेश्वराचे वचन ऐका.

12दावीदाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही सकाळी न्याय करा. जो लूटलेला त्याला पीडणाऱ्याच्या हातातून सोडवा. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा रोष अग्नीप्रमाणे बाहेर निघेल आणि त्याला कोणीही विझवू शकणार नाही.’

13खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, ‘आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?

14“परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हांला शिक्षा करीन. आणि मी तीच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 21 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran