Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 18 >> 

1यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे, ते म्हणाले:

2“ उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.”

3म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता,

4पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले.

5तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले:

6परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्यांनो, तुमच्याबरोबर ह्या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो, स्राएलाच्या घराण्यांनो पाहा! जशी माती कुंभाराच्या हातात असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात.

7एखाद्यावेळी मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलेल, ते बाहर काढने, फाडून टाकने किंवा नाश करणे असे बोलेल.

8पण जर ज्या राष्ट्राविषयी मी बोललो, ते आपल्या दुष्कृत्यांपासून फिरले तर मी जे त्यांच्याविषयी करण्याचे योजीले होते त्याबद्दल अनुतापेन.

9आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन.

10पण त्यांनी माझ्या दृष्टीमध्ये वाईट असे केले, तर मी जे चांगले सांगत होतो ते थांबवीन आणि त्यांच्यासाठी मी ते करीन.

11“ तर आता, यहूदाच्या मनुष्यांशी आणि यरुशलेम येथे राहणाऱ्यांना असे सांग, की परमेश्वर असे म्हणतो: ‘ पाहा! मी तुमच्यावर संकटे आणण्याचे पाहत आहे. मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा प्रत्येक आपल्या दुष्ट मार्गाविषयी पश्चाताप करा, आणि आपली मार्गे व आपली कर्मे नीट करा.”

12पण ते म्हणतात, आशा नाही, यास्तव आपण आपल्या योजनांनुसार कार्य करूया.‘आम्ही प्रत्येक आपल्या दुष्ट हृदयाच्या इच्छेप्रमाणे वागू.”

13यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “दुसऱ्या राष्ट्रांना विचारा, ह्या अशा गोष्टी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ इस्राएलाच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे.

14लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दुर पर्वतातून वाहणऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?

15पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात आणि आपल्या मार्गात अडखळणे करतात. त्यांनी पूर्वजांच्या जुन्या वाटा सोडून ते आडवळणाने चालतात.

16यास्तव तो देश भयानक आणि सर्वकालासाठी फूत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.

17मी त्यांना पुर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यांपुढे उडवीन. त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही कर पाठ दाखवणार.

18तेव्हा ते लोक म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द योजना करु, कारण याजकापासून नियमशास्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला, आणि संदेष्ट्यांपासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्याला शब्दांचा मारा देऊ, आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही.”

19हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे! आणि माझ्या वैऱ्यांचा आवाज ऐक.

20त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.

21यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तरवारेकडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या बायका वांझ आणि वाधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.

22तू त्यांच्यावर अचानक टोळी आणशील तेव्हा त्यांच्या घरातू आरोळी ऐकू येवो, कारण त्यांनी माझ्या पायाकरीता सापळा रचला आहे आणि मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे.

23परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस. त्याऐवजी ते तुझ्यासमोरुन फेकले जावोत, तू रागाच्या समयी त्यांच्याविरुद्ध कार्य कर.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 18 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran