Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jeremiah 1 >> 

1हिल्कीयाचा मुलगा यिर्मयाची ही वचने, जो बन्यामीन प्रांताच्या अनाथोथमध्ये याजकांपैकी होता,

2म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया, ह्याच्या दिवसात, त्याच्या तेराव्या वर्षात, ज्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले.

3तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीया मुलगा सिद्कीया त्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरुशलेमधील लोकांना पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले.

4परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,

5“मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे, आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”

6यावर मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.”

7पण परमेश्वर मला म्हणाला, “‘मी लहान बालक आहे’ असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.

8त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”

9मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.

10खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी, आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”

11परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.”

12परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.”

13मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्या कडे आले आणि म्हणाले, “ तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जीचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.”

14परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल,

15कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरुशलेमच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील.

16आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निकाल घोषित करिन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पुजा केली, ह्या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरूध्द शिक्षा सांगेन.

17“यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करणार.

18पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे असे केले आहे, ह्यासाठी की तू ह्या भूमीवरच्या सर्वांविरुद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरुध्द आणि लोकांविरुद्ध समर्थपणे उभे राहावे.

19ते सर्व लोक तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jeremiah 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran