Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 25 >> 

1मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला,

2“मानवपुत्रा, अम्मोनच्या लोकांकडे पाहा आणि माझ्यावतीने त्यांच्याशी बोल.

3त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलाच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुद्ध होता.

4म्हणून मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते तुमची जमीन घेतील. तुमच्या देशात त्यांचे सैन्य तळ ठोकेल. ते तुमच्यामध्ये राहतील. ते तुमचे अन्न व दूध भक्षण करतील.

5“मी राब्बा शहराचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन देशाला मेंढ्यांचा कोंडवाडा करीन. मगच तुम्हाला समजेल की मीच देव आहे.

6परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात व तेथे नाचलात. इस्राएलाच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.

7म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन. सैनिकांनी युद्धात लुटलेल्या अमूल्य वस्तूंप्रमाणे तुम्ही व्हाल. तुम्ही तुमचा वारस गमवाल. तुम्ही दूरदेशी मराल. मी तुमच्या देशाचा नाश करीन. मगच तुम्हाला मीच परमेश्वर आहे! हे समजून येईल.”

8परमेश्वर, माझा प्रभू पुढीलप्रमाणे गोष्टी सांगतो: “मवाब व सेईर (अदोम) म्हणतात ‘यहूदा इतर राष्ट्रांप्रमाणेच आहे.’

9मी मवाबचा खांदा कापीन. देशाला भूषणावह असलेली बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही सीमेवरची शहरे मी काढून घेईन.

10मग ही शहरे मी पूर्वेच्या लोकांना देईन. त्यांना तुमची भूमी मिळेल. मी त्यांना अम्मोनच्या लोकांचा नाश करु देईल. अम्मोन हे एक राष्ट्र होते, ह्याचा लोकांना विसर पडेल.

11मी मवाबला शिक्षा करीन. मग त्यांना मीच परमेश्वर आहे. हे कळेल.”

12परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “अदोमचे लोक यहूदाच्या लोकांच्याविरुद्ध गेले आणि त्यांनी त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून अदोमचे लोक अपराधी आहेत.”

13म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.

14मी माझ्या लोकांच्या, इस्राएलाच्या हातून, अदोमचा सूड उगवीन. अशा रीतीने, माझा अदोमवरचा राग इस्राएलचे लोक दाखवून देतील. मग मी अदोमला शिक्षा केल्याचे अदोमच्या लोकांना कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

15परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.”

16म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “मी पलिष्ट्यांना शिक्षा करीन. हो! करथच्या लोकांचा मी नाश करीन. समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांचा मी संपूर्ण नाश करीन.

17मी त्या लोकांना शिक्षा करीन. मी सूड घेईन. माझ्या रागाने मी त्यांना धडा शिकवीन. मग त्यांना ‘मीच परमेश्वर असल्याचे कळेल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 25 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran