Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Revelation 7 >> 

1आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चारकोनावर उभे राहीलेले पाहीले; त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये.

2मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने आेरडून म्हणाला,

3आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.

4ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी एेकली इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.

5यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर गाद वंशापैकी बारा हजारांवर

6आशेर वंशापैकी बारा हजारांवर नफताली वंशापैकी बारा हजारांवर मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर

7शिमोन वंशापैकी बारा हजारांवर लेवी वंशापैकी बारा हजारांवर इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर

8जबुलून वंशापैकी बारा हजारांवर, योसेफ वंशापैकी बारा हजारांवर बन्यामीन वंशापैकी बारा हजारावर शिक्का मारण्यात आला.

9या गोष्टीनंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या हाेत्या.

10ते मोठ्याने आेरडून म्हणत होते राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.

11तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते, आणि ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करीत

12म्हणाले,"आमेन!धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत! आमेन!".

13तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?

14मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.

15म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या मंदिरात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील.

16ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.

17कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल, आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Revelation 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran