Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Deuteronomy 27 >> 

1मग मोशे आणि इस्राएलमधील वडीलजन, यांनी लोकांना आज्ञापीले कि, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.

2तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.

3त्या धोंडयावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्यादिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या दुधामधाच्या भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.

4यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.

5तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.

6वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.

7तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा.

8मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”

9मग मोशे आणि लेवी याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.

10तेव्हा परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे वागा. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळा.

11त्याच दिवशी मोशेने लोकांना हेही सांगितले,

12ते यार्देन नदी पार करून जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन यांनी आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे.

13तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

14लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,

15“मूर्ति घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो.” या मूर्ति म्हणजे कोणा कारागीराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा विट आहे! तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

16“नंतर लेवींना लोकांना सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

17परत लेवींना म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

18लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे.

19लेवींना म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

20लेवींनी म्हणावे “वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

21लेवींना म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

22लेवींना म्हणावे, “सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

23लेवींना म्हणावे, “सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”

24लेवींना म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”

25लेवींना म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”

26लेवींना म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Deuteronomy 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran