Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Titus 1 >> 

1देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी, आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडून:

2जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले,

3त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,

4अपल्या समाईक असलेल्या विश्र्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.

5मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.

6ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.

7अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;

8तर अतिथिप्रिय, चांंगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,

9आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासहि शक्तिमान् व्हावे.

10हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.,

11त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात, आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.

12त्यांच्यामधील त्यांच्याच एका संदेष्ट्याने म्हटले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, दुष्ट पशू व आळशी, खादाड आहेत.’

13ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.

14यासाठी की, त्यांनी यहूदी कल्पीत कहाण्यांकडे, आणि सत्याकडून वळविणार्‍या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.विश्वासात खंबीर व्हावे.

15जे शुध्द आहेत अशा लोकांना सर्व गोष्टी शुध्द आहेत; पण जे विटाळलेले आहेत, आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुध्द नाही; पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.

16ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्याला नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे, आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Titus 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran