Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Romans 2 >> 

1म्हणून दुसर्‍याला दोष 2लावणार्‍या, अरे मनुष्या, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यांत तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.

2पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.

3तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या, आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे मनुष्या, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यात सुटशील असे मानतोस काय?

4किंवा देवाची दयेची तुला पश्चातापाकडे नेत आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?

5पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.

6तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.

7म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;

8परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,

9संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लणी, अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.

10पण चांगले करणार्‍या प्रत्येक प्रथम यहूद्याला आणि ग्रीकास गौरव शांती व सन्मान ही मिळतील.

11कारण देवाजवळ पक्षपात नाही.

12कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.

13कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.

14कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात;

15आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात, किंवा एकमेकांचे समर्थन करतात, आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या मनांवर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.

16देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे, जेव्हा माणसांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.

17आता जर, तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस, आणि देवाचा अभिमान मिरवतोस;

18तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे;

19आणि तुझी खातरी आहे की, तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश,

20अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ, नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;

21तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?

22व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?

23जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?

24कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे, निंदा होत आहे.

25कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असुनही तीन झाल्यासारखीच आहे.

26म्हणून कोणी मणुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?

27आणि, देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?

28कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही; किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.

29कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय; आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Romans 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran