Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Romans 13 >> 

1प्रत्येक जनाने आपल्यावर असलेल्या अधीकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.

2म्हणून, जो अधिकाराऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो; आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणतील.

3कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही, पण वाईट कामात असते; मग, तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर, आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.

4कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण, तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तरवार धरीत नाही. कारण, तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.

5म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे.

6ह्या कारणास्तव तुम्ही करही देता. कारण ह्याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.

7म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला आदर त्याला आदर, ज्याला मान त्याला मान.

8तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका. कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.

9कारण, ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, ’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’, ह्या एका वचनात ती समावलेली आहे.

10प्रीती आपल्या शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.

11आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.

12रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या.

13दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत, किंवा अमंगळपणात व कामातुरपणात, किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.

14तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Romans 13 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran