Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Lamentations 2 >> 

1परमेश्वराने सियोनकन्येला आपल्या क्रोधाच्या ढगाने कसे झाकले आहे. त्याने इस्राएलाचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर टाकून दिले आहे. त्याने कोपाच्या दिवशी आपल्या पाय ठेवण्याचे आसन आठवण केली नाही.

2परमेश्वराने याकोबाची सर्व वस्तीस्थाने गिळून टाकले आणि अजिबात दया दाखविली नाही. संतापाच्या भरात त्याने यहूदाकन्येच्या गडांचा नाश केला. त्याने ते धुळीला मिळविले आहे. त्याने राज्य व त्यातले सरदार ह्याना भ्रष्ट केले आहे.

3त्याने आपल्या संतप्त रागाने इस्राएलाचे सर्व शृंग नष्ट केले. त्याने आपला उजवा हात शत्रूंपासून मागे घेतला आहे. सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे.

4त्याने शत्रूंप्रमाणे आपला धनुष्य वाकवला आहे. तो शत्रूसारखा आपला उजवा हात उगारून उभा राहीला आहे. त्याने सर्व लोक जे दृष्टीस बहूमूल्य होते त्यांना कापून टाकले. सियोनकन्येच्या तंबूत त्याने आपला राग अग्नीसारखा ओतला आहे.

5परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्राएलांस गिळले. त्याने तिच्या राजवाड्यांना उध्वस्त केले. त्याने यहूदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे.

6बागेतील मंडप उपटून टाकावा, तसा परमेश्वराने आपला स्वत:चा तंबू उखडला. परमेश्वराने सण व शब्बाथ सियोनेत विसर पाडला आहे, आणि आपल्या रागाच्या संतापाने त्याने राजा व याजक यांना तुच्छ मानले आहे.

7परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे. त्याने तीच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.

8सियोनकन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरवले आहे. त्याने त्यावर दोरी ताणली आहे, आणि आपला हात संहार करण्यापासून आवरला नाही. म्हणून त्याने तट व कोट ह्यास शोक करायला लावला आहे. ते सर्वच व्याकूळ झाले आहेत.

9तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत. त्याने वेशींचे अडसर तोडून नष्ट केले. तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्र नसलेल्या राष्ट्रात आहेत. तिच्या संदेष्टयांनासुध्दा परमेश्वराकडून दृष्टांन्त मिळत नाहीत.

10सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर मूकपणे बसले आहेत. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत. यरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहे.

11माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत. माझ्या अातड्यांना पीळ पडत आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत.

12ती मुले त्यांच्या आयांना म्हणतात, धान्य आणि द्राक्षारस कोठे आहे? घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला.

13यरुशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू, सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करु शकेल?

14तुझ्या संदेष्ट्यांनी दृष्टांत पाहीले जे तुझ्यासाठी निरर्थक व मुर्खपणाचे होते. तुला पाडावपणातून परत आणायला त्यांनी तुझे अपराध प्रकट केले नाही. पण त्यांनी खोट्या देववाणी आणि तुला घालवून देण्याची खोटी कारणे पाहिली.

15जाणारे-येणारे तुला बघून टाळ्या वाजवतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते फुत्कारतात व आपली मान हलवतात. लोक जिला सौंदर्यपूर्ण नगरी अथवा पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का? असे ते म्हणतात.

16तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुध्द तोंड वासवले आहे. ते तुझ्याकडे पाहून फूत्कारतात आणि दात-ओठ खातात व म्हणतात, आम्ही तीला गिळले आहे. आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो. अखेर तो उजाडला.

17परमेश्वराने ठरविल्याप्रमाणे केले आहे. त्याने जे वचन फार पूर्वी जाहीर केले होते, ते त्याने परिपूर्ण केले आहे. त्याने नाश केला व दया केली नाही. शत्रूंनी तुझ्यावर आनंद करावा असे त्याने केले आहे. देवाने तुझ्या शत्रूचे शिंग त्याने सामर्थ्यशाली बनविले.

18त्यांच्या मनाने परमेश्वराला आरोळी केली, सियोनकन्येच्या तटबंदी, तू रात्रंदिवस नदीप्रमाणे अश्रू वाहू दे. तुझ्या डोळ्यातील बाहूलीला विसावा नको देऊ.

19ऊठ आणि रात्री मोठ्याने ओरड. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.

20परमेश्वरा, पाहा, जीच्याशी तू कठोरपणाने असे केले, तीच्या कडे लक्ष लाव. स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना, खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?

21रस्त्यांत भूमीवर तरुण आणि वृध्द पडले आहेत. माझे तरुण व तरूणी तलवारीने पडले आहेत. आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांना तू मारलेस आणि दया केली नाही.

22जसे सभेच्या दिवसाप्रमाणे तसेच माझी भये सभोंवर बोलावली आहे. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही, व वाचला नाही. मी ज्यांचे लालनपालन केले व वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ठ केले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Lamentations 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran