Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Nehemiah 1 >> 

1हखल्याचा पुत्र नहेम्या याची ही वचने,आता असे झाले की,विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी, शूशन या राजवाड्यात होतो.

2माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहूदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यापैकी जे यहूदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरुशलेमाविषयी मी त्यांना विचारपूस केली.

3त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत. त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. कारण यरुशलेमाची तटबंदी कोसळून पडली आहे. तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”

4हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गीय देवाची प्रार्थना केली.

5मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीति करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्यांजवर करुणा करतोस.

6तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपाकरून डोळे उघडून पाहा आणि कान देऊन ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द जी पापे केली आहेत, ती मी कबुल करतो की, मी व माझ्या वडीलांच्या घराण्याने पाप केले आहे.

7आम्ही तुझ्या दृष्टीने अतिशय वाईट वर्तन केले आहे . तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.

8मी तुला विनंती करतो आपला सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्याला तू म्हणाला होतास, “जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हाला दुसऱ्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला पांगवून टाकीन.

9पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतःपर्यत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन.”

10पाहा, हे तुझे सेवक असून ते तुझे लोक आहे. तुझ्या प्रचंड सामर्थ्याने व बलवान हाताने तू या लोकांना सोडवलेस.

11तेव्हा, हे प्रभू, मी तुला विनवणी करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आज तुझ्या सेवकाला यश दे आणि ह्या माणसावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Nehemiah 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran