Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 92 >> 

1परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे

2सकाळी तुझे वात्सल्य आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.

3दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.

4कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.

5हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.

6पशुतुल्य माणसाला ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,

7दुष्ट गवताप्रमाणे उगवले आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.

8परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.

9हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.

10पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहे; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.

11माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.

12नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

13जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.

14वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.

15हे यासाठी की,परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 92 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran