Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 85 >> 

1हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहे; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.

2तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.

3तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिर.

4हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हाला परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.

5सर्वकाळपर्यत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?

6तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?

7हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हाला दे.

8परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.

9खचित जे त्याला भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव राहावे.

10दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; नीति आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे आणि स्वर्गातून नीतिमत्व खाली पाहत आहे.

12जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमि आपले पिक देईल.

13त्याच्यासमोर नीतिमत्व चालेल आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 85 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran