Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 83 >> 

1हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा,आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.

2पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.

3ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या सुरक्षितांविरूद्ध योजना करतात.

4ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणीत राहणार नाही.

5त्यांनी एकमताने,एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.

6ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,

7गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलेशेथ आणि सोरकर हे ते आहेत.

8अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.

9तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.

10ते एन-दोर येथे नष्ट झाले आणि ते भूमीला खत झाले.

11तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.

12ते म्हणाले,देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.

13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.

14अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.

15तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.

16हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यानी तुझ्या नावाचा शोध करावा.

17ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते बदनामीत नष्ट होवोत.

18नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 83 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran