Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 8 >> 

1परमेश्वर आमच्या देवा, तू ज्याने आपले वैभव आकाशांवर स्थापीले आहे, त्या तुझे नाव सर्व पृथ्वीत किती उत्कृष्ठ आहे.

2तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणारा यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तांन्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.

3तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.

4तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवन करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?

5तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहे. आणि गौरवाने व आदराने तू त्याला मुकुट घातला आहे.

6तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे त्यांना अधिपत्य तू दिलेस. तू सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहेः

7सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.

8आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

9हे परमेश्वर, आमच्या देव, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ठ आहे!


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran