Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 77 >> 

1मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.

2माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभुला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली;तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.

3मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.

4तू माझे डोळे उघडे ठेवतो; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.

5मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.

6रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि मी काय घडले हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

7प्रभु सर्वकाळ आमचा नाकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?

8त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?

9देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?

10मी म्हणालो, “हे माझे दुःख आहे, आमच्या प्रति परात्पराचा उजवा हात बदलला आहे

11पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करील; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.

12मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.

13हे देवा, तुझे मार्ग चमत्कारीक आहे, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.

14अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.

15याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांना आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.

16जलाने तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.

17मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटाल; तुझे बाणहि चमकू लागले.

18तुझ्या गर्जनेची वाणी वावटळीत ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी हलली आणि थरथरली.

19समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाही.

20मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांना कळपाप्रमाणे नेलेस.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 77 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran