Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 69 >> 

1देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.

2इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही. मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे. मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत. मी आता लवकरच बुडणार आहे.

3मी मदतीसाठी याचना करून थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली.

4मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत. ते विनाकारण माझा तिरस्कार करतात. माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात. माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात. मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.

5देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.

6प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.

7माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.

8माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात. माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.

9तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.

10मी रडतो, उपवास करतो आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.

11माझे दु:ख दाखवण्याकरता मी जोडेभरडे कपडे वापरतो आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.

12ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात. मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.

13माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्विकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते.

14मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.

15लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्‌यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.

16परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.

17तुझ्या सेवकापासून दूर जाऊ नकोस, मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.

18ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव.

19तुला माझी लाज ठाऊक आहे. माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे. या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.

20शरमेने मला गाडून टाकले आहे. लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे. मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही. कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.

21त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे. त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.

22त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.

23ते आंधळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो.

24त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे.

25त्यांची घरे रिकामी कर. त्यात कुणालाही राहू देऊ नकोस.

26त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील, त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दु:ख आणि जखमा खरोखरच असतील.

27त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस.

28जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक. त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.

29मी खिन्न आणि दु:खी आहे देवा, मला वर उचल, मला वाचव.

30मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.

31यामुळे देव आनंदीत होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.

32गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.

33परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.

34देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.

35परमेश्वर सियोनाला वाचवेल. परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील. ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.

36त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल. ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 69 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran