Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 6 >> 

1हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला सुधारु नकोस, किंवा मला शिक्षा करु नकोस.

2हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे थरथरत आहेत.

3माझा जीव फार घाबरला आहे. तर हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?

4हे परमेश्वरा, तुझे कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.

5कारण मरणात तुझे काही स्मरण नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करीन?

6मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. सबंध रात्र मी माझ्या अश्रुंनी माझे अंथरुण ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धून काढतो.

7शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शंत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.

8अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझ्या रडण्याचा शद्ब ऐकला आहे.

9परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्विकार केला आहे.

10माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघरे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran