Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 46 >> 

1देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.

2म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.

3समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.

4एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख-समृध्दी आणतात.

5देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.

6जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.

7तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.

8परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ.

9परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.

10देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”

11तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 46 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran