Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 27 >> 

1परमेश्वरा माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?

2जेव्हा दुष्ट माझे मास खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.

3जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरुद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.

4मी परमेश्वराला एक गोष्ट मागीतली, तीच मी शोधेल, “परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, परमेश्वराच्या घरात वस्ती करीन.

5कारण माझ्या संकट समयी तो माझा लपण्याचे ठाकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल , तो मला खडकावर उंच करणार.

6तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रूंवर माझे मस्तक उंचावल्या जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अपर्ण करणार, मी गाईन, होय, परमेश्वराला मी स्तुति गाईन.

7परमेश्वरा, मी तुला आरोळी करणार तेव्हा माझा आवाज ऐक! माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे.

8माझे हृदय तुला म्हणाले, त्याचे मुख शोधा, परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन.

9तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकला रागात फटकारू नकोस! तू माझा मदतगार होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा मला त्यागू नकोस.

10जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला मला उचलून घेईल.

11परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव.

12माझा जीव शत्रुस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरुद्ध उठले आहेत, आणि ते हिंसेच श्वास टाकतात.

13जीवंताच्या भुमीत जर मी परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.

14परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 27 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran