Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 24 >> 

1भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.

2कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.

3परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?

4ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुध्द आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.

5तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच च्याच्या तारणाच्या देवापासून न्यायीपण मिळेल.

6हिच पीढी त्याला शोधणारी आहे, जे यकोबाचा देव याचे मुख शोधतात.

7वेशींनो, आपले मस्तक उंच करा. सर्वकालच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

8गौरशाली राजा कोण आहे? तो परमेश्वरच, सामर्थशाली आणि थोर.

9वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकालच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा , म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

10तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 24 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran