Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 22 >> 

1माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारयला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दुर का आहेस?

2माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.

3तरी तू पवित्र अाहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतो.

4आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.

5देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.

6परंतू मी कीटक आहे मी मनुष्य नाही, जो मनुष्यासाठी कलंक आणि लोकांसाठी तिरस्कार असा आहे.

7सर्व माझ्याकडे बघणारे मला टोमणा मारतात; ते माझा उपहास करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

8ते म्हणतात “ तो परमेश्वरावर विश्वस ठेवतो, तर परमेश्वर त्याला सोडवो. त्याने त्याला वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”

9परंतू मला उदरांतून बाहेर काढणारा तूच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वस ठेवायला शिकवले.

10मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.

11माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही.

12खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.

13जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरुद्ध उघडले आहे.

14मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणा सरखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.

15फुटलेल्या खापरा प्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.

16“कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.

17मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून आणि बाघतात राहतात.

18त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात.

19परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.

20परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्या पासून वाचव.

21सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

22परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

23जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! इस्राएलाच्या सर्व वंशजांनो, त्याला मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.

24कारण परमेश्वर संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केली नाही. आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा दु:खीतांनी त्याला आरोळी केली, तर त्याने ऐकले.

25परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझी स्तुती तुझ्यापासूनच आली आहे. त्याचे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.

26गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाल राहो.

27सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.

28कारण रज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.

29पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहे, ते त्याला नमन करतील.

30येणारी पीढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पीढीला प्रभुबद्दल सांगतील.

31ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran