Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 14 >> 

1मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशे पाप केले आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.

2परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा अाहे काय?

3प्रत्येकजण बहकून बाजूला गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. चांगले करतो असा एकही नाही , नाही, ऐकही नाही.

4जे अन्याय करणारता त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांना खातात; परंतू ते परमेश्वराला हाक मारत नाहीत.

5ते भीतीने थरथर कापले, कारण न्यायींच्या सभेत देव आहे.

6तुम्ही गरीब माणसाचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.

7अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांना पाडावपणातून सोडवेल, तेव्हा याकोब आंनदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran