Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 125 >> 

1जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे अढळ,सर्वकाळ टिकणारे आहेत.

2यरुशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.

3नीतिमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नीतिमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नीतिमान जे काही चुकीचे आहे ते करतील.

4हे परमेश्वरा, जे चांगले आहेत आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.

5पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल इस्राएलांवर शांती असो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 125 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran