Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 112 >> 

1परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो,तो आशीर्वादित आहे.

2त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील.

3धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते.

4धार्मिक माणसांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.

5जो माणूस दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.

6कारण तो माणूस कधीही हलणार नाही; नीतिमान माणसाची आठवण सर्वकाळ राहील.

7तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्याला खात्री आहे.

8त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यत तो भिणार नाही.

9तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.

10दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 112 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran