Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 10 >> 

1हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटसमयी तू स्वत:ला का लपवतोस?

2कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतू कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजीले आहेत, त्यात ते सापडो.

3कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; लोभी परमेश्वराला तुच्छ मानतो आणि नाकारतो.

4दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे देवाला पाहू शकत नाही. कारण देवाबद्दल त्याला काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.

5तो सर्वदा सुरक्षीत असतो, परंतू तुझे धार्मीक नियम त्याच्या आवाक्या बाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्करतो.

6तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पीढ्यात माझ्यावर आपत्ती येणारच नाही.

7त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.

8तो गावाजवळ टपून बसतात, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतात; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.

9जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.

10त्याचे बळी पडणारे ठेचल्या आणि झोडल्या जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.

11तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.

12हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.

13का दुष्टाने देवाला नाकारले आणि आपल्या हृदयात असे का बोलला, तू मला जबाबदार धरणार नाही?

14तू ते पाहीले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.

15दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.

16परमेश्वर सदासर्वकाल राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.

17हे परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय बळकट केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.

18परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण करतो, म्हणजे कोणी मनुष्य पृथ्वीवर आणखी भयंकर होऊ नये.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran