Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Mark 4 >> 

1पुन्हा तो समुद्रकिनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका तारवात जाऊन बसला, आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते.

2तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला;

3ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला;

4आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले.

5काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले.

6पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले, व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.

7काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही.

8काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.''

9तो म्हणाला, ''ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.''

10तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले.

11तो त्यांना म्हणाला, '' देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हाला दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.

12यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परतु त्यांना दिसणार नाही, आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये. नाहीतर कदाचित ते फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.

13तो म्हणाला, '' हा दाखला तुम्हाला समजला नाही काय तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हाला कसे समजतील.

14पेरणारा वचन पेरतो.

15वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.

16तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;

17तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.

18काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात,

19परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.

20चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.

21आणखी तो त्यास म्हणाला, '' दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?

22प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.

23ज्याला कान आहेत ते ऐको!

24तो त्यास म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.

25कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.

26आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो.

27रात्री झोपी जातो, व दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही.

28जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.

29पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”

30आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?

31ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी.

32तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”

33असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे.

34आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.

35त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.”

36मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते.

37तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले.

38परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”

39मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.

40तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही विश्वास कसा नाही?”

41परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील ह्याचे ऐकतात.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Mark 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran