Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Matthew 8 >> 

1मग तो डोंगरावरून खाली उतरल्यावर लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालले.

2आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुध्द कारावयास आपण समर्थ आहात

3तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुध्द हो; लागलेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.

4मग येशूने त्याला म्हटले, पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस ‘याजकाला दाखीव’ आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुध्दीकरता, मोशेने नेमिलेले अर्पण वाहा.

5मग येशू कफर्णहूमास आल्यावर (एक शंभर शिपायावर अधिकारी असणारा, ) शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला,

6प्रभूजी, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.

7येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन.

8तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण मा‍झ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.

9कारण मीही एक अधिकारी असून मा‍झ्या हाताखाली शिपाई अाहेत मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसर्‍याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो.

10हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचीत सांगतो, मला इस्त्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.

11मी तुम्हाला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्चिमेकडून’ पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्याच्या पंक्तीस बसतील;

12परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.

13मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेविल्याप्रमाणे तुला मिळाले आहे, आणि त्याच घटकेस तो नोकर बरा झाला.

14नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.

15तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली.

16मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणिले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले.

17त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, ’ असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

18मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली.

19तेव्हा कोणीएक नियमशास्त्र येऊन त्याला म्हणाला, गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.

20येशू त्याला म्हणाला, खोकडास बि‍ळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.

21मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्याला म्हणाला, प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या.

22येशूने त्याला म्हटले, तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्याच्या मेलेल्यांना पुरू दे.

23मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले.

24तेव्हा पाहा, समुद्रांत मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागली; तो तर झोपेत होता.

25तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत.

26तो त्यांना म्हणाला, अहो, अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकावले आणि सर्व अगदी शांत झाले.

27तेव्हा त्या माणसांना नवल वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!

28मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.

29तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, ‘ तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पीडावयास येथे आला आहेस काय?’

30तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.

31मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे.

32त्याने त्यास म्हटले, जा मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला.

33मग चारणारे पळाले आणि त्यानी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.

34तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Matthew 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran