Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Matthew 3 >> 

1त्यादिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानांत येऊन अशी घोषणा करू लागला की,

2पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.

3त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते की, "अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा’; त्याच्या ‘वाटा सरळ करा."

4ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.

5तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला.

6त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.

7परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो दुष्ट सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?

8हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;

9आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे;

10आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.

11मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु मा‍झ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या चपला उचलून चालण्याची देखील माझी लायकी नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.

12त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.

13तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालीलाहून यार्देन नदीवर त्याच्याकडे आला;

14परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?

15येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे; कारण ह्याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणाला योग्य आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले.

16मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येतांना पाहीला,

17आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Matthew 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran