1मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मरीया मग्दालीया व मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या
2त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
3त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
4पहारा करणारे शिपाई, खूप घाबरले, ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसांसारखे झाले.
5देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.
6पण तो इथे नाही.कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याला ठेवले होते ती जागा पाहा.
7आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मरणातून उठला आहे.आणि बघा, तो तुमच्यापुढे गालिलात जात आहे. आणि तुम्ही त्याला तेथे पाहाल.’पाहा, “मी तुम्हाला सांगितले आहे.”
8तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या.व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
9मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केले.
10तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “ भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे.ते तिथे मला पाहतील.”
11त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
12नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
13ते म्हणाले, “लोकांना असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
14हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही.”
15मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर बोलण्यात येते.
16पण अकरा शिष्य गालीलात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
17आणि त्यांनी त्याला बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.
18तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
19म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
20आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”