Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Matthew 1 >> 

1जो अब्राहामाचा पुत्र, जो दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्त याची वंशावळी,

2अब्राहामाला इसहाक; इसहाकाला याकोब, याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले.

3यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह.पेरेसाला हेस्त्रोम, हेस्त्रोमाला अराम झाला;

4अरामाला अम्मीनादाब, अम्मीनादाबाला नहशोन, नहशोनाला सल्मोन,

5सल्मोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रूथपासून ओबेद, ओबेदाला इशाय;

6आणि इशाय हा दावीद राजाचा बाप होता.दावीद शलमोनाचा बाप होत जो उरीयाच्या बायकोपासून झाला होता.

7शलमोन रहबामाचा बाप होता, रहबाम अबीयाचा बाप होता., अबीया आसाचा बाप होता,

8आसा यहोशाफाटाचा बाप होता, यहोशाफाट योरामाचा बाप होता, अाणि योराम उज्जीयाचा बाप होता.

9उज्जीया योथामाचा बाप होता, योथाम आहाजाचा बाप होता, आहाज हिज्कीयाचा बाप होता,

10हिज्कीया मनश्शेचा बाप होता, मनश्शे आमोनाचा बाप होता, आमोन योशीयाचा बाप होता,

11आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीया हा यखन्या व त्याचे भाऊ यांचा बाप होता.

12बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्या शल्तीएलचा बाप होता. शल्तीएल जरूब्बाबेलाचा बाप होता,

13जरूब्बाबेल अबीहूदाचा बाप होता, अबीहूद एल्याकीमाचा बाप होता, एल्याकीम हा अज्जुराचा बाप होता;

14अज्जुर सादोकाचा बाप होता, सादोक याखीमचा बाप होता, याखीम एलीहूदचा बाप होता;

15एलीहूद एलाजारचा बाप होता, एलाजार मत्तानचा बाप होता, मत्तान याकोबाचा बाप होता,

16याकोब योसेफाचा बाप होता. जो मरीयेचा पती होता जीच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला.

17सर्व पीढ्या अब्राहामापासून दावीदापर्यंत चौदा पीढ्या होत्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

18येशू ख्रिस्ताचा जन्म ह्याप्रकारे झाला. त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झाली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.

19तिचा पती योसेफ नीतिमान होता आणि समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे मागणी मोडण्याचा निर्णय केला.

20तो असे विचार करीत असता त्याला स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, "योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला अाहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.

21ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव, अाणि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील, "

22हे सर्व अशासाठी झाले की, जे प्रभूने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे

23"पाहा कुमारी गर्भवती होईल अाणि पुत्राला जन्म देईल, आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील." ह्या नावाचा अर्थ, आम्हाबरोबर देव.

24तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला,

25तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही. अाणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Matthew 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran