Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Malachi 2 >> 

1“आणि आता, याजकांनो तुम्ही, हा आदेश तुमच्यासाठी आहे.

2सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महीमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हांवर शाप पाठवीन आणि तुझ्या आशिर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यांस आधीच शाप दिली आहे. कारण तु माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.

3पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुझ्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हालाही फेकून देण्यात येईल.

4आणि तेव्हा तुम्हांला कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी ह्या आज्ञा तुम्हांकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

5“लेवीबरोबरल केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्याला तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्याला वाटले.

6खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले.

7कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.”

8“परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांना नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीच्या करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

9“ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तु माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्रापाळण्यात पक्षपात केला आहे.”

10आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरूद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?

11यहूदाने विश्वासघात केला आणि यरुशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केलल्या आहेत. यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.

12जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वराला अर्पण करतो त्यालाहि परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील.

13आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण आणखी मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही.

14तुम्ही म्हणता “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी तीच्याशी तु विश्वासघाताने वागू नये.

15आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केला नाही काय? आणि त्याने तुम्हांला एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीहि आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.

16इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपले वस्र हिंसेने झाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”

17तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वराला कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्याला आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्याला त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्याला कंटाळविले आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Malachi 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran