Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  The Song of Songs 3 >> 

1(ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो त्याची उत्कंठा मला लागली. मी त्याला उत्कटतेने शोधले पण तो मला सापडला नाही.

2मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्याला शोधले पण मला तो सापडला नाही.

3शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”

4मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही. मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्याला सोडले नाही.

5(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरुशलेमेच्या कन्यांनो, रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. आमचे प्रेम करणे संपत नाही तोपर्यंत त्यात व्यत्यय आणू नका.

6(ती तरूणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी रानातून येणारी ती ही कोण आहे?

7पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.

8ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.

9राजा शलमोनाने स्वत:साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.

10त्याने खांब चांदीचे केले. पाठ सोन्याची केली. बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.

11(ती स्त्री यरुशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्यादिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. ज्या दिवशी तो खूप आनंदी होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  The Song of Songs 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran