Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 5 >> 

1या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्त्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”

2फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्त्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला ओळखत नाही. म्हणून इस्त्राएलास मी जाऊ देणार नाही.”

3मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हाशी बोलला आहे. म्हणून आम्हाला रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर यास यज्ञार्पण करु द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.”

4परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जावयास का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा.

5फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.”

6त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली.

7तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांना विटा बनविण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणण्यास सांगा.

8तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनविल्या पाहिजेत. त्यात काही कमी करून स्विकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून व म्हणतात, आम्हाला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे.

9तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”

10म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, फारो असे म्हणतो, तुम्हाला विटा बनविण्यासाठी लागणारे गवत देणार नाही.

11तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.

12म्हणून मग लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले.

13त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरिता त्यांच्यामागे सतत तगादा लावीत.

14मिसराच्या मुकादमांनी इस्त्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांस फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवीत होता तेवढ्या आता का बनवीत नाही.

15मग इस्त्राएली नायक तक्रार घेऊन फारोकडे गेले व म्हणाले, “आम्ही जे तुमचे सेवक त्या आमच्याशी तुम्ही अशाप्रकारे का वागत आहा?

16तुम्ही आम्हाला गवत देत नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा बनविण्याचा हुकूम करता. आणि आता आपल्या दासास मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.”

17फारो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात, तुम्ही आळशी आहात. म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हाला परमेश्वराला यज्ञ करण्यास जाऊ देण्याची परवानगी दे.

18आता आपल्या कामावर माघारी जा. तुम्हाला गवत काही मिळायचे नाही परंतु पूर्वी इतक्याच विटा तुम्ही केल्या पाहिजेत.”

19आपण संकटात आहोत हे इस्त्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करता कामा नये त्यांना शक्य नव्हते.

20फारोच्या भेटीनंतर परत जाताना त्यांना वाटेत मोशे व अहरोन भेटले;

21तेव्हा ते मोशे व अहरोनास म्हणाले, परमेश्वर तुम्हाकडे पाहो व तुम्हास शिक्षा करो. कारण फारो व त्याचे सेवक यांच्या दृष्टीने तुम्ही आम्हास अपमानकारक केले आहे. आम्हास मारून टाकण्यास तुम्ही त्यांच्या हातात जणू तलवारच दिली आहे.

22मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रार्थना करीत म्हणाला, “प्रभू तू या लोकांस का त्रास देत आहेस? तू मला पहिल्या जागी का पाठवलेस?

23मी फारोकडे तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तूं आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाही.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran