Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 25 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2“इस्त्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.

3त्यांच्याकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशीः सोने, चांदी, पितळ;

4निव्व्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;

5लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;

6दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;

7एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”

8मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांना माझ्यासाठी एक पवित्र तयार करावे.

9निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुम्हास दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.

10“बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीज हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.

11तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.

12त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.

13बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढावावेत

14कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.

15हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”

16देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोहि त्या कोशात ठेवावा.

17मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीज हात, रूंदी दीड हात असावी;

18मग सोन्याचे घडीव काम करून दोन करूब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.

19एक करूब एकाबाजूला व दुसरा करूब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.

20त्या करूबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.

21दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;

22तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करूबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्त्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.

23बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.

24ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.

25मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.

26मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना त्या लावाव्यात.

27ह्या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी ह्या कड्यांमध्ये दांडे घालावे.

28मेज वाहून नेण्यासाठी बाभळींच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.

29मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरिता वाट्या बनीव. ही शुद्ध सोन्याची असावीत.

30माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी

31शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.

32त्या दीपवृक्षाला एकाबाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.

33प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या ह्या कळ्याफुलांसह असाव्यात.

34ह्या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहित असलेल्या फुलाप्रमाणे असावीत.

35ह्या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखापैकी दोन दोन शाखा त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.

36त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.

37मग ह्या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.

38दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.

39हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहित एक किक्कार शुद्ध सोन्याची करावा;

40आणि मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 25 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran