Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Exodus 11 >> 

1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हाला येथून जाऊ देईल; तो तुम्हाला जाऊ देईल तेव्हा तो तुम्हांला सर्वस्वी ढकलून काढून लावील,

2तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.

3मिसरी लोकांची इस्त्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता.

4मोशे लोकांना म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन

5आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील.

6मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.

7परंतु इस्त्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील त्यांच्यावर भुकणार नाही यावरून मी परमेश्वर इस्त्राएली व मिसराच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.

8मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, “तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.

9मग परमेश्वर मोशेला म्हणाला होता की, फारो तुमचे ऐकणार नाही. हे यासाठी की, मी मिसर देशामध्ये पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्या.

10आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्त्राएल लोकांना बाहेर जाऊ दिले नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Exodus 11 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran