Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Genesis 36 >> 

1एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही,

2एसावाने कनानी मुलींतून बायका करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा

3आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.

4एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.

5आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे त्याला कनान देशात झाले.

6एसाव आपल्या बायका, आपले मुलगे, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला.

7कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यात त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना.

8एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात.

9सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ :

10एसावाच्या मुलांची नावे : एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रगुवेल.

11अलीपाजचे मुलगे तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज.

12अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची बायको अदा हिची नातवंडे होती.

13रगुवेलाचे हे मुलगे होते : नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची बायको बासमथ हिची नातवंडे होती.

14सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.

15एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे : तेमान, ओमार, सपो, कनाज,

16कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती.

17एसावाचा मुलगा रगुवेल याचे मुलगे हे : सरदार नाहथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.

18एसावाची बायको अहलीबामा हिचे मुलगे : यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.

19हे एसावाचे मुलगे होते, आणि हे त्यांचे वंश होते.

20त्या देशात सेईर नावाच्या होरी माणसाचे मुलगे हे : लोटन, शोबाल, सिबोन, अना,

21दीशोन, एसर व दिशान. हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.

22लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती.

23शोबालाचे मुलगे : अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.

24सिबोनाचे दोन मुलगे होते : अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.

25अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.

26दीशोनाचे हे मुलगे होते : हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.

27एसराला बिल्हान, जावान व अकान हे मुलगे होते.

28दीशानाला ऊस व अरान हे मुलगे होते.

29होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी : लोटान, शोबाल, सिबोन, अना,

30दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहाणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.

31इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच :

32बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.

33बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.

34योबाब मेल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले.

35हुशाम मेल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.

36हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.

37साम्ला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.

38शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.

39बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.

40एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे : तिम्ना, आल्वा, यतेथ,

41अहलीबामा, एला, पीनोन,

42कनाज, तेमान, मिब्सार,

43माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Genesis 36 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran