Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Genesis 10 >> 

1नोहाच्या शेम, हाम व याफेथ ह्या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.

2याफेथाचे मुलगे गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.

3गोमरचे मुलगे आष्कनाज, रीपाथ व तोगर्मा हे होते.

4यावानाचे मुलगे अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.

5यांच्यापैकी समुद्रकिनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.

6हामाचे मुलगे कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.

7कुशाचे मुलगे सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.

8कुशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता होता.

9तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी, अशी म्हण पडली आहे.

10त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.

11त्या देशातून तो अश्शुरात गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालाह ही शहरे बांधली

12आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.

13मिस्राईम हा लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम,

14पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी निघाले), व कफतोरीम, ह्यांचा बाप बनला.

15कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,

16तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

17हिव्वी, आर्की व शीनी

18अर्वादी, झेमारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.

19कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.

20कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.

21शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.

22शेम याचे मुलगे एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.

23अरामाचे मुलगे ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.

24अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.

25एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.

26यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह

27हदोराम, ऊजाल, दिक्ला

28ओबाल, अबीमाएल, शबा,

29ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे मुलगे होते.

30त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफरपर्यंत होता.

31आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे मुलगे.

32पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Genesis 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran