Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hebrews 5 >> 

1प्रत्येक प्रमुख याजकाची निवड लोकांमधून होते. आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता प्रमुख याजक नेमलेला असतो.

2जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.

3आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.

4आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.

5त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने प्रमुख याजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”

6दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस”

7येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.

8जरी तो पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.

9आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला

10व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो प्रमुख याजक म्हणून नियुक्त झाला.

11याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हाला ते स्पष्ट करणे कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहा.

12आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहा.

13कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच अाहे.

14परंतु ज्यांच्या ज्ञानद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hebrews 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran