Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hebrews 12 >> 

1म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.

2जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

3तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.

4तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.

5आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहा काय? “माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोे.

6कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो.”

7हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हाला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?

8परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.

9याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?

10आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.

11कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.

12म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!

13तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्याला मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे.

14सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा.

15तुम्ही सांभाळून राहा,यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हांस उपद्रव देऊ नये,

16कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.

17नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चातापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.

18ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.

19कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.

20कारण जी आज्ञा केली होती ती ते सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”

21खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “ मी अति भयभीत व कंपित झालो आहे .

22परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम ,लाखो देवदूत

23स्वर्गातील यादीतल्या जेष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्म्ये,

24आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.

25जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा. कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपामून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.

26त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.”

27“पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील.

28म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;

29कारण आपला 'देव भस्म करणारा अग्नी आहे.'


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hebrews 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran