Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 9 >> 

1हे इस्त्राएला इतल लोकांसारखा आनंद करु नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस, तुला प्रत्येक खळखावर व्यभिचाराचे वेतन आवडते.

2पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, नवा द्राक्षारस त्यांना निराश करेल.

3ते यहौवाच्या देशात राहणार नाही, त्याशिवाय एफ्राहम मिसरात परत जाईल आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगल पदार्थ खातील.

4ते यहोवास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाही, त्यांचे बलीदान त्यांचा साठी शोकाची भाकर होईल जे ते खातील ते अशुध्द होतील कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, ते यहोवाच्या मंदीरात आणता येणार ना.

5यहोवाच्या द्राक्षरसाचे दिवशी नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल?

6कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईन, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांची डेरे काटयांनी भरुन जातील.

7शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, एस्त्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे तुझ्या आता वैरभावामुळे संदेष्टा मूर्ख बनला आहे.

8संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे तो एफ्राहमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे आणि त्यात देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे.

9गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखे त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे.

10यहोवा म्हणतो, मला इस्त्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मुर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मुर्तिसारखे घृणास्पद झाले.

11एफ्राहमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.

12जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी त्यात कोणी राहू नये मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!

13मी एफ्राहमास पाहिले तेव्हा तो मला कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बळी देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल.

14त्यास दे, यहोवा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे.

15कारण त्यांची गिल्गालातील सर्व अधमता, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.

16एफ्राहम रोगी आहे त्यांचे मुळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही, त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारुन टाकेन.

17माझा देव त्यांना नाकारेल कारण त्यांची त्यांचे ऐकले नाही, ते देशोदेशी भटकणारे होतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hosea 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran