Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 2 >> 

1“आपल्या भावांना म्हणा, ‘माझे लोक!’ आपल्या बहिणींना म्हणा, ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”

2तुमच्या आई विरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.

3जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्षा भुमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.

4तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.

5त्यांची आई वेश्या राहलेली आहे व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईल, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझे लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.

6म्हणून मी तीच्या मार्गात काटेरी कुंपण घालेन, मी तीच्या विरुध्द भिंत बांधेन म्हणजे तिला वाट सापडणार नाही.

7ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठु शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तीला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.

8कारण तिला हे ठाऊ नाही की, तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षारस, तेल पुरवणारा व सोने आणि चांदी सढळपणे दिली, नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.

9म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तीचा द्राक्षारस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईल.

10नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करील व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

11मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शब्बाथ आणि नेमलेले सर्व सन मी बंद करीन.

12मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझा प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करील आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.

13तिने बआलास धूप दिला आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तीला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.

14यास्तव मी तीला परत मिळवणार मी तीला जंगलात घेऊन जाणार आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.

15मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून आखोन व्हरी देईन. तेव्हा ती मला उत्तर देईन जसे तिने आपल्या तरुणपणे दिले होते जेव्हा ती मिसर देशातून आली होती.

16हे यहोवा घोषित करतो की, त्या दिवसात असे घडेल, तुला, माझा पती म्हणशील आणि त्यानंतर मला बआल म्हणणार नाही.

17कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तडांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.

18त्या दिवशी मी इस्त्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.

19ती यहोवा तुझा कायमचा वाग्दत्त पती होईल. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया हयांत तुझा वाग्दत्त पती होईल.

20मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन व तू हे जावशील की मी यहोवा आहे.

21आणि त्या दिवशी, मी उत्तर देईन, असे यहोवा घोषीत करतो, मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईल.

22आणि भूमी धान्य, नवा द्राक्षारस आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.

23मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन आणि लो रुहामावर दया करीन जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hosea 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran